Sunday, 7 April 2013

सातारा बदलतोय का?

दिनांक ६/४ /१३  

एकेकाळी सातारा जिल्ह्याच नाव घेतलं की नजरेसमोर यायचं ते शूरवीरांचा जिल्हा,मर्द मावळ्यांचा जिल्हा,मराठ्यांच्या राजधानीचा जिल्हा आणि अजिंक्यतार्याच्या कुशीत वसलेला तसेच निसर्गाने नटलेला एक सुंदर जिल्हा.
अलीकडच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस चा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असलेला सातारा. पण आज सातारा खरोखरच बदलतोय का ? 
माघील पंधरा दिवसातील घटनांमधून तरी असेच वाटतंय की सातारा खरच बदलतोय. ज्यांनी समाज्यात आदर्श निर्माण करायचा त्यांनीच आपल्या कृतीमधून स्वतः चे व साताऱ्याचे नाव राज्यात व देशात बदनाम केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री ज्या सातारा जिल्ल्यातून येतात त्याच सातारा जिल्यात मुख्यमंत्र्यांच्या मित्र पक्ष्यातील नेत्यांनी साताऱ्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवून ठेवलेत.दोन वेगवेगळ्या घटनांमधे सातारा जिल्हा पंधरा दिवसांमध्ये सतत चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. 
त्यामधील पहिली घटना लक्ष्मन मानेंची तर दुसरी घटना वसंतराव मानकुमरे यांची.
उपरा या आत्मचरित्राने प्रसिद्ध झालेले व शरद पवारांच्या कृपेने यशाची एक एक पायरी सर केलेले पद्मश्री सारख्या पुरस्काराने सन्मानित असलेले माजी आमदार  लक्ष्मन मानेअस काही करतील असे कोणालाही वाटले नसेल पण ज्या वेळी पाच तक्रारी नोंद झाल्या त्या वेळी सर्वांचे डोळे उघडले. ज्याला कर नाही त्याला डर कशाला त्याप्रमाणे जर मानेनी असे काही कृत्य केलेच  नसेल तर त्यांनी पळून जायला नाही पाहिजे होते ज्या अर्थी ते पळून गेले आहेत त्यामुळे त्यांनी असे केलेच असेल यावर शिकामोर्तब होते.यावरून खरी शोकांतिका म्हणजे ज्या सातार्याच्या पोलिसांना माने पंधरा दिवस सापडत नाहीत हि आहे. मानेचे राष्ट्रवादी व पवारांबरोबरचे संबंध यामुळे तर पोलिसांना मानेना शोधण्यात यश येत नाही का? अशी शंका घेण्यात वाव आहे. 
एकेकाळी शिवसेनेत असलेले जावलीचे वसंतराव मानकुमरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले.सत्तेची हवा लागलेले मानकुमरे पत्रक काढून जिल्हाधिकाऱ्यांचे मुंडके तलवारीने उडवण्याची भाषा करतात. गुन्हा नोंद झाल्यानंतर फरार होतात. पोलिस लक्ष्मन माने आणि वसंतराव मानकुमरे या घटनांमधून तरी असेच वाटते कि खरच सातारा बदलायला लागलाय. 

Thursday, 4 April 2013

महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ

दिनांक ४/४/१३

प्रिय मित्रानो
आजपासून 'असेच काहीतरी 'या ब्लॉग वर लिहिण्याचा प्रयत्न  करीत आहे .
 महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी परिस्तिथी असताना आय पी एल हवी का?
तहानलेल्या महाराष्ट्रातील जनतेला पिण्याचे पाणी द्यायचे सोडून आपले सत्ताधारी आय पी एल मधून मिळणाऱ्या प्रसिद्धीसाठी हपापलेले आहेत हि खरे तर निंदाजनक  बाब आहे.
अशा  सत्ताधार्यांना येणाऱ्या निवडणुकीतून त्यांची जागा दाखवण्याची संधी आपणा सर्वाना येणार आहे.